Posts

Showing posts from 2017

मंगळवेढा

          मंगळवेढा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका ठिकाण आहे. ही भूमी श्री संत दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा या सारख्या संतांनी पावन झालेली आहे. सोलापूर पासून ५४ किलोमीटर तर दक्षिण काशी, पंढरपूर पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूर अतांग पसरलेले काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिध्द आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढ्याची लोकसंख्या सुमारे २१६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याची साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे. मंगळवेढ्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात. मंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके घेतली जातात. मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्य...